ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅव्हल्स व टिप्परची जोरदार धडक एक गंभीर जखमी तर १४ जखमी

ब्रह्मपुरी नागभिड रोडवर सायगाटा फाट्या जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

नागपूर वरून ब्रह्मपुरी कडे भरधाव वेगाने येत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सने ब्रम्हपुरी वरून नागपूरला जाणाऱ्या हायवा ट्रकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एक गंभीर जखमी तर पंधरा जखमी झाल्याची घटना आज दुपारी २.१५ च्या दरम्यान नागभिड ब्रम्हपुरी रोड वरील सायगाटा फाट्यावर घडली.

सविस्तर वृत्त की, वडसा वरून पुन्हा नागपूरला जाता यावे म्हणून नागपूर वरून भरधाव वेगाने निघालेल्या खाजगी श्री ताज ट्रॅव्हल व ब्रह्मपुरी कडून जाणारा टिप्पर यांच्यात आज दु.२/१५ ला समोर धडक होऊन भिषण अपघात झाला.

सायगाटा जवळ झालेल्या अपघातात १५ जण जखमी झाले असून जखमी मध्ये अजमेर पठाण नागभीड वय 22, सुनंदा लोखंडे कुही वय 29, दीपिका मते वडसा 27, चंद्रकला धोटे नागपूर 70, कमलाबाई इंदुरकर नागपूर 78, पवन कराडे चिमूर 32, मुस्कान पठाण नागभीड 25, निशांत मेश्राम मुल 39, कुणाल मडावी नागभीड 16, जितेंद्र गेडाम कुनघाडा 26 सचिन धोटे नागपूर 32, गुड्डू धोंगडे नागपुर 37, एकनाथ गजभिये चिमूर 40, छत्रीगसिंग बावणे वडसा 45 या प्रवाशांचा समावेश आहे. यात दोन गंभीर जखमी आहेत.दुचाकी व एका कारला ओव्हर टेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल टिप्पर ला जाऊन धडकून भिषण अपघात झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

यावेळी उपस्थित पत्रकार नंदु गुडडेवार यांना घटनेची माहिती मिळताच स्वतःची चार चाकी वाहन घेऊन घटना स्थळी जावून जखमींना गाडीत टाकून रुग्णालयात दाखल केले.टिप्पर आरमोरी कडून नागपूर कडे रेती घेऊन मोठ्या प्रमाणात जाणे सुरू असते.‌खाजगी ट्रॅव्हल्स ही मोठ्या संख्येनं नागपूर, गडचिरोली जात येत असतात.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

गंभीर जखमी ट्रॅव्हल कंडक्टर जितेंद्र गेडाम याचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये