ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

30 मार्च पासून धुंडिराज महाराज मठात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प पू श्री धुंडीराज महाराज कविश्र्वर यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन प पू धुंडीराज महाराज उपासनाधम, देऊळगाव राजा येथे कऱण्यात आले आहे.

याप्रसंगी ह भ प श्री प्रकाश खांडेभराड व ह भ प श्री शरदचंद्र सावजी यांचे प्रवचन तसेच ह भ प श्री रामायणाचार्य सतिश महाराज डोईफोडे, व ह भ प श्री संतचरणदास निकम गुरूजी यांचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे.1एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ह भ प डॉ भगवानबाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होईल.

भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक श्री धुंडीराज महाराज कवीश्वर पुण्यतिथी उत्सव समिती, देऊळगाव राजा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये