ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.राजू थूल यांना धम्मभूषण पुरस्कार भदंत आनंद महाथेरो येणाडा यांचे हस्ते प्रदान

धम्मभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरुन शुभेच्छाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा – यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी या छोट्याशा गावात गेल्या 32 वर्षापासून जागतिक बौद्ध धम्मपरीषदेचे आयोजन सातत्याने भिक्कू संघ करत आहे.या परीषदेला देशातिलच नाही तर विदेशातील भंते प्रामुख्याने उपस्थित असतात म्हणूनच ही परीषद जागतिक धम्मपरिषद म्हणून नावारुपाला आली आहे. या जगप्रसिद्ध धम्मपरीषदेचे ऊद्घाटण मा. राजरत्न आंबेडकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मुंबई यांचे हस्ते करण्यात आले.

अनेक नामवंत भंतेजींच्या धम्मदेसना झाल्या. याच धम्मपरीषदेमध्ये समतानगर वर्धा येथिल सेवानिवृत्त शिक्षक, सामाजिक, संघटनात्मक व धार्मिक कार्य गेल्या पंचवीस वर्षापासून करणारे मा.राजू थूल यांना धम्मभूषण पुरस्कार भदंत आनंद महाथेरो येणाडा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

    त्यांना धम्मभूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये