ताज्या घडामोडी

भर बाजारपेठेत दुचाकीच्या डिक्कीतुन चोरट्याने केली अडीच लाखांची चोरी – चोरीची घटना सीसीटीव्ही मधे कैद

सकाळी साडे अकरा वाजता घडली घटना -काँग्रेस नेते संतोष चन्ने ह्यांना दिवसाढवळ्या लागला अडीच लाखांचा चुना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा शहरात ऐन बाजारपेठेत भरदिवसा चोरीचा थरार अनुभवायला मिळाला असुन राजुरा पंचायत समितीचे माजी सभापती, काँग्रेस नेते संतोष चन्ने ह्यांच्या दुचाकीच्या डिक्की मधुन चोरट्याने तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड लिलया लंपास केली.

प्राप्त माहितीनुसार शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या हाजी गुलाम हुसैन ह्यांचे शबाब स्टील नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेस नेते संतोष चन्ने सदर दुकानात 11:30 वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने आले. दुचाकी उभी करून त्यांनी डीक्की मधुन आधी पाण्याची बाटली काढून पाणी पिले व त्यानंतर डीक्की मधील प्लॅस्टिकच्या पिशवीतुन नोटांचे एक बंडल काढून बाकीची रक्कम डीक्कीत ठेवून ते दुकानात गेले.

 

ह्याच दरम्यान एक युवक दुचाकी जवळ येऊन उभा राहिला व त्याने कुठलीतरी वस्तु दुचाकीच्या इग्निशन मधे टाकून सराईतपणे डीक्की उघडली व आतील अडीच लाखांची रोकड असलेली प्लॅस्टिकची पिशवी अलगद काढून निघुन गेला. संतोष चन्ने घरी गेल्यावर त्यांनी पैसे काढण्यासाठी डीक्की उघडली असता त्यातील पैशांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी तत्काळ शबाब स्टील येथे जाऊन तिथे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या युवकाने केलेल्या चोरीचा संपूर्ण व्हिडिओ कैद झाला असुन पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये