ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा जि. प.शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना: कोरपना तालुका अंतर्गत गडचांदूर केंद्रातील जि. प. प्राथ.शाळा लालगुडा या ठिकाणी स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

         यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपली नृत्य कला सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी विनोदी गाण्याने आपली कला सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसापूर्वी स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना आयोजित भव्य खुल्या नृत्य स्पर्धेत शाळेने उपविजेते पद पटकावले होते. ते पद पटकावणाऱ्या चिमुकल्यांचा यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. लालगुडा जिल्हा परिषद शाळेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

        याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, उपाध्यक्ष वर्षा कोडापे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धूर्वे, भिकाजी सिडाम, मोतीलाल तोडासे, मुख्याध्यापक प्रकाश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका कोडापे या विद्यार्थिनीने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये