ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जी.एम.पी.ए.महिला डॉक्टरांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथे जनरल मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन जी एम पी ए महिला कमिटी द्वारा आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन चटप शाळा सभागृहामध्ये करण्यात आले होते.

मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर असोसिएशन द्वारा विविध स्पर्धांमध्ये नृत्य स्पर्धा संगीत खुर्ची गायन स्पर्धा मध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले याप्रसंगी सर्व महिलांनी एकमेकांना मकर संक्रांतीनिमित्त उपयुक्त वस्तूच्या रूपात वान देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये परिवारातील बालकांनी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट डान्स सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस वंदन करून सुरू करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता विरुडकर प्रस्तावना डॉ. आरती पानघाटे तर आभार प्रदर्शन डॉ हिना झाडे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये शोभा भोयर, नलिनी खेकडे, हिरादवे मैडम, डॉ.स्नेहा डाखरे,डॉ.नंदिनी मोरे,डॉ. मुगावे, डॉ. पल्लवी चटप,डॉ. प्रणाली गोवारदिपे,डॉ अनुपमा किंगरे, कवठे मैडम, कल्पना सोनटके, प्रिया धोटे, सगुणा लोणगाडगे, स्मिता विरुटकर इत्यादि महीलानि सहभाग घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये