ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरासमोरुन चारचाकी मारोती -इको वाहन चोरटयांनी केले पसार

अज्ञात चोरटया विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 तालुक्यातील देऊळगाव मही येथील बालाजी नगरातील रहवाशी सुनिल दत्तू इंगळे यांची मारोती सुझकी कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.21- BV -0164 अंदाजे कींमत 3,70,000 रूपये कींमतीची चार चाकी गाडी दि.2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी घरा समोरून पसार केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर गाडी नातेवाईक कृष्णा गणेश लोखंडे रा. लोखंडे बरनजंळा ता. भोकरदन जि. जालना यांच्याकडून सुनिल इंगळे यांनी विकत घेतली होती अद्यापही चार चाकी गाडी मारोती सुझुकी कंपनीची इको नावावर केलेली नसून ती गाडी फक्त वापरात आहे.

नेहमी प्रमाणे चारचाकी घरासमोर लावलेले वाहन रात्रीला चोरटयांनी मोठ्या शिताफिने सुरु करुण पसार झाले. शहरातील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कैमराची पाहणी केली असून पोलिसांनी शोध सुरु केला आहे.अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देऊळगांव राजा ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय नारायण गिते करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये