ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागेवर ठार

संबधितावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 जालना चिखली रोड वरील दगडवाडी फाट्याजवळ देऊळगाव राजा येथून त्यांच्या गावी जात असलेल्या दुचाकीस्वारा ला मालवाहू वाहनाने समोरासमोर धडक देऊन दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना दिनांक दोन ला सायंकाळी घडली याप्रकरणी आज देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला सदर मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की

 चिखली तालुक्यातील काटोडा येथील मृतक गौतम पुंडलिक पैठणे 55 वर्ष देऊळगाव राजा येथून त्यांच्या गावी त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांकMH 04 -DZ 7591 वरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मॅक्झिमो कंपनीचे मालवाहू वाहन MH 28 BB 0761 च्या वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजेपणे चालवून दुचाकी स्वराला गंभीर धडक दिली घटनास्थळावरून माहिती मिळताच डॉक्टर अक्षय गुट्टे हे ॲम्बुलन्स सह घटनास्थळावर पोहोचले परंतु धडक गंभीर असल्यामुळे रस्त्यातच त्यांची प्राण देऊत मालवली याप्रकरणी संदीप देवबा पैठणे राहणार काठोडा पोस्ट गांगलगाव तालुका चिखली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये