ताज्या घडामोडी

रेती माफियांच्या हल्ल्यांना जबाबदार कोण ?

भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवरा

चांदा ब्लास्ट शेखर गजभिये ————————————–

विशेष प्रतिनिधी
नागपूर : रेती माफियांकडून अधिकारी. कर्मचाऱ्यावर हल्ला होण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. संबंधित शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचारातून अशी प्रकरणे निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात मात्र प्रामाणिक रेती व्यावसायिकांचा बळी जात आहे.
नुकतेच रामटेक – तुमसर मार्गावर महिला एसडीओवर हल्ला झाल्याची घटना घडली. यापूर्वीही अनेक अधिकारी – कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहे. या निमित्ताने रेती माफियांच्या हल्ल्यांना जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.
रेती व्यावसायिकांनी कायदा हातात घेणे ही मुळातच चुकीची बाब आहे. रीतसर त्यांनीही आपल्या तक्रारी, म्हणणे मांडावे. परंतु त्यांची बाजू कोणीही एकूण घेत नाही, त्याच्याकडे एक बकरा म्हणूनच बघितले जाते, अशीही बाब समोर आली आहे.
वास्तविक रेतीचोरी व्हावी, रेती माफिया तयार व्हावेत अशीच इच्छा संबंधित विभागाची असते. कारण त्याच्या व्यवसायामुळे अधिकारी- कर्मचारी व पटवारी मालामाल होत आहेत.
अधिकारी कर्मचारी व पटवारी रेती व्यावसायिकांकडून लाच घेऊन ट्रक सोडतान. कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते समाजच त्याला प्रामाणिकपणे जगू देत नाही.
विना रॉयल्टी रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी अधिका-यांकडून मोर्चेबांधणी केली जाते अयवा कंबर कसली जाते. वास्तविकता ही मोर्चेबांधणी रेती व्यावसायिकांडून वसुलीसाठी केली जाते ही बाब आता एका प्रकरणावरून उघडकीस आली आहे. या संदर्भात एक पीड़ित व्यावसायिक स्वप्निल तरेकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की. ओवरलोडच्या नावावर त्यांचा दहा चक्का ट्रक पारशिवनी तहसिलच्या अधिकाऱ्यांनी २८/१२/२०२२ रोजी पकडून तहसिलीत जमा केला. त्यानंतर त्यांनी ट्रकमधील रेतीची मोजगी करण्याची मागणी केली. या प्रकरणाला आता दोन वर्षे होत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या रेतीची मोजनी करण्यात आली नाही किंवा ट्रकही सोडला नाही. आज स्वप्निल तरेकार यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी समस्या अनेक रेती व्यावसायीकांची आहे.
आपले घरदार गहाण ठेवून कर्ज काढून ट्रक घेतला जातो. व्यवसाय असो किंवा नसो बैंकेचा हप्ता व चुकता चुकवावा लागतो, परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे रेती व्यावसायिकांवर बेकारीची वेळ आली आहे. स्वप्निल तरेकार यांचे दुसरे प्रकरण सावनेर तहसील कार्यालयाचे आहे. त्यानी संबंधित कर्मचान्यांना लाच दिली नसल्याच्या कारणावरून रिकामा ट्रक कार्यालयाच्या आवारात जमा करून ट्रकमध्ये रेती असल्याचा पंचनामा करून रॉयल्टी भरण्याची नोटीस देण्यात आली यादरम्यान त्यांच्या ट्रकची कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ऐशीतैशी करन्यात आली. सावनेर तहसिलच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रकची बॅटरी, डिझेलची चोरी करण्यात आली. याशिवाय अनेक महत्त्वाचे महागडे स्पेअर पार्ट काढण्यात आले. यासंदर्भात तहसिल कार्यालयात लेखी तक्रार दिली असता पीडित तरेकार यांना उद्धट वागणूक देण्यात आली.
स्वप्निल तरेकरांचा ज्या तहसिलदारानी ट्रक पकडला त्यांची बदली झाली. बदली होण्यापूर्वी त्यांनी १० ते १२ द्रक सोयीस्कर रित्या सोडून दिले मात्र कर्जबाजारी झालेल्या तरेकर यांचा ट्रक अडवून ठेवला.
अशाच प्रकारे संजय लांजेवार यांचे पाच अंडरलोड ट्रक विना रॉयल्टीच्या नावावर सावनेर तहसिल कार्यालयात जमा आहे. अंडरलोडच्या नावावर गाड्या पकडून जमा करण्यात येतात परंतु वर्षे होऊनटी ट्रकमधील रेतीची मोजणी करण्यात येत नाही.
रॉयल्टीचे अडीच लाख रुपये भरावे लागतात आणि चोरी करून अडीच लाख रुपयांची कमाई होते. त्यामुळे ते चोरीचा मार्ग पत्करतात. त्यात संबंधित विभागाचे महाशय त्यांना चिरीमिरी घेऊन मदत करतात. मग यातूनच रेती माफियांचा जन्म होतो, याला जबाबदार कोण ? वरून आदेश आले की पुन्हा कंबर कसली जाते: ज्यांनी पैसे दिले त्यांची गाडी सुटते व ज्यांनी नाही ‬‎ दिले त्यांची गाडी जमा केली जाते. हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.
——
(बॉक्स)

रेती चोरीला भ्रष्टाचार कारणीभूत
—————————- वरिष्ठ अधिकारी प्रामाणिक असले तरी त्यांच्या अधीन असलेले अधिकारी कर्मचारी’ व पटवारी यांचे हात भ्रटाचाराने बरबटलेले आहेत. रेती व्यावसायिकांना कारवाईच्या आधीच टीप दिली जाते. रेती व्यावसायिकांडून तहसीलदार ५० हजार ब पटवारी १० हजार लाच घेतात , अशी तक्रार रेती व्यावसायिक स्वप्निल मरेकार यांनी एसडीएम रामटेक येथे दि. १९/६/२०२३ रोजी केलेली आहे, परंतु आजतागायत त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे कळते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये