ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दोन आरोपितांवर गुन्हा नोंद ; एकूण 1 लाख 89 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दि. 02/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन रामनगर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता रात्र पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून आर्वी नाका ते धुनिवाले मठ बॅचलर रोड साई मंदिर जवळ, आदिवासी कॉलनी वर्धाकर्ड जाणा-या रोडवर सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, आरोपी नामे 1) मंगेश उर्फ जॉन शंकरराव कोकाटे, वय 37 वर्ष, रा. वार्ड नं. 04 आदीवासी कॉलनी वर्धा हा मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करतांना मिळुन आला असुन, त्याचे पाठीवर असलेल्या एका स्कुल बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर गांजा अंमली पदार्थ आरोपीने 2) यश नावाचा ईसम रा. सावंगी मेघे वर्धा याचेपासुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1,225 किलोग्रॅम कि. 24,500 रू 2) एक बजाज 220  पल्सर मोटर सायकल क्र. एम.एच. 49 बी.जे. 7866 कि 1,50,000 रू 3) एक विवो कंपनीचा ॲन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू 4) एक स्कुल बॅग कि. 300 रू, असा जु.कि. 1,89,800 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. रामनगर  येथे कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 एन.डी.पि.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व आरोपीस पो.स्टे. रामनगर यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.

     सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, गजानन दरणे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे व पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये