ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी देऊळगाव राजा शहराचा केला कायापालट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री बालाजी महाराज यांच्या पुण्यनगरी देऊळगाव राजा नगर परिषद ला 1 फेब्रुवारी ला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने नगर परिषद च्या वतीने अमृत महोत्सव साजरा केला जात आहेत,यात भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा पासूनच देऊळगाव राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर पावले उचलत शहरात अतिशय जलद गतीने विकास कामे करून लोकप्रियता मिळवली आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणे निघत नव्हती मात्र मोकळ साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन नियमानुसार कारवाई करीत रस्ते मोकळे केले, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकरांनी मोठ्या प्रमाणात शासनाकडून करोडो रुपये चा विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकास कामे जलद गतीने झाली आहेत व सुरू आहे.

शहरात चौका चौकात सौदर्यीकरण केले आहेत, शहरातील आमना नदी चे सौंदर्य वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे, शहरात सिमेंट रोड ची कामे युद्ध पातळीवर सुरु आहे, तसेच नळ योजनेचे काम सुद्धा वेगाने सुरु आहे,26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पावतो अमृत महोत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शहरवासीयांना चांगली मेजवानी दिली आहे, न भूतो न भविष्यती अशी विकास कामे करून मुख्याधिकारी मोकळ यांनी नावलौकिक केला आहे. त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये