ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार दिनानिमित्त अनैशा वाहन चालक संघटनेच्या वतीने वरोरा येथे मतदार जनजागृती व रक्तदान शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा देण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा भारतीय राज्यघटनेने बहाल केलेला सर्वोच्च अधिकर हा मताधिकार आहे. निवडणूकीतून आपला योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे म्हणून गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला मतदार दिनानिमित्त अनैशा वाहन चालक कामगार संघटना शाखा वरोरा जि. चंद्रपूर तर्फे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोज गुरूवारला आलिशान सेलिब्रेशनच्या समोरील खुल्या मैदानात मतदार जनजागृती शिबीर आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

मतदार दिनानिमित्त आयोजित मतदार जनजागृती आणि रक्तदान शिबिरास अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे महासचिव कमलेश राऊत, महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे, जिल्हाध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, सचिव संतोषभाऊ वाघमारे उपस्थित होते.

राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर यांच्या पथकातील डॉ. जितेंद्र चौधरी आणि यांच्या पथकातील आशिष कांबळे, सुनील चंदनखेडे, अमूल रामटेके, अमोल जिद्देवार, रुपेश घुमे, चेतन वैरागडे, इत्यादी सहकाऱ्यांनी सदर रक्तदान शिबिर घडवून आणण्यासाठी सहकार्य केले.

मतदार जनजागृती आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात अनैशा वाहन चालक कामगार वरोरा शाखेचे अध्यक्ष संदीप कुबडे, पंडित आत्राम, महेश भुसारी, सुरेश मडावी, हर्ष गायधने, मंगल डोंगरे, मिथुन मडावी इत्यादींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये