ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फाउंडेशन दे. राजा तर्फे सामाजिक संदेशात्मक हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सिव्हील कॉलनी देऊळगाव राजा येथे मकर संक्रांती निमित्त 24 जानेवारी ला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फाउंडेशन दे राजा च्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला यामधे प्रबोधनाच्या,रांगोळीच्या,बॅनरच्या,तसेच फुलाच्या सजावटी मधून विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्यात आले ज्यामधे मुलींना वाचवा मुलींना शिकवा,झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण करा,पाण्याचे महत्व सर्व महिलांना पटवून “पाणी वाचवा” या प्रकारची मोहीम राबवा,सर्व धर्म समभाव, एकात्मतेच,आणि वेळेच महत्त्व, “सामर्थ्यवान महीला सामर्थ्यवान भारत” अश्या प्रकारचे संदेश देण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ सुनीता गजानन तिडके,रेखा दीपक बोरकर,वैशाली तिडके,मेघा निकम,सुनीता रा.तिडके,डॉ सविता खरात,वंदना खांडेभराड, वैशाली तायडे,पूनम घोडके जयश्री गाडेकर नंदिनी तिडके,कविता माने,कुसुम झोरे पुष्पा झोरे सविता कातखडे संगीता शेवाळे प्रियंका माळोदे, स्मितल रा.माळोदे कांचन माळोदे ,मोनिका वाघ सुनीता वाघ ,सोनाली सोनुने संगीता जाधव गीता तिडके कमल मेहेत्रे ,सुनीता राऊत वंदना विधाते आदी महिलांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तिडके यांनी तर आभार प्रदर्शन मा.नगरसेविका रेखा बोरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये