ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालय गडचांदुरला नॅकचा B++ ( CGPA 2.94) दर्जा

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

          गडचांदूर येथील शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालयाला बी + + (CG PA – 2.94 )दर्जा प्राप्त झाला असून महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत असून अवघ्या ७ गुणांनी महाविद्यालयाचा A ग्रेड हुकला आहे.

     नॅक च्या निर्देशानुसार महाविद्यालयाची सुविधा गुणवत्ता आणि दर्जा यांचे मूल्यांकन करण्यासाठी दिनांक १६ आणि १७ जानेवारी २०२४ ला नॅक पीयर टीम ने महाविद्यालयाला भेट दिली होती.

     नॅक च्या सात निकषानुसार महाविद्यालयाने सर्वच पातळीवर यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांचे कुशल मार्गदर्शनाखाली आइक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. संजय गोरे आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य गण, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सर्व पालक यांच्या अथक प्रयत्नातून या महाविद्यालयाने हे यश संपादन केले आहे या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये