Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

घोडपेठ येथे दोन ट्रकचा विचीत्र अपघात

ट्रकच्या धडकेने महामार्गावरील अतिक्रमीत दुकाने नेस्तनाबूत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          भद्रावती तालुक्यातील नागपूर चंद्रपूर महामार्गावरील घोडपेठ ग्रामपंचायतीच्या समोर बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दोन ट्रकांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक देत महामार्गावरील अतिक्रमण उखडत भुईसपाट केले आहे. अपघातात जिवितहानी झाली नसली तरीही अतिक्रमण धारक दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे.

नागपूर चंद्रपूर महामार्गावरील घोडपेठ ग्रामपंचायतीच्या समोर ट्रक क्र.एम एच ३४ एबी ७००१ हा थांबला होता. अचानक रात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने येणारा हायवा क्र. एमएच ४० वाय ००३७ याने उभ्या असलेल्या ट्रकला धोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की यामुळे ग्रामपंचायतच्या समोरील महामार्गावर असलेल्या अतिक्रमीत दुकाने भुईसपाट झाली. अपघातग्रस्त दोन्ही ट्रक महामार्गापासून अंदाजे ७० मिटरपर्यंत फरफटत गेले. यामध्ये महामार्गावर असलेली आमलेट सेंटरची गाडी, चप्पलजोडे दुरूस्तीचे टिनाचे दुकान, नाश्ता दुकानाचे शेड, खर्रा सेंटरचे शेड हे सगळे क्षणात भुईसपाट झाले. महामार्गावरच असलेल्या जिल्हा परिषद शाळेने लोखंडी पोलच्या कंपाऊंडला तोडत दोन्ही ट्रक थांबले. रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने जिवीतहानी झाली नाही, मात्र महामार्गावरच्या दुकानदारांचे नुकसान झाले.

नागपूर चंद्रपूर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या दुतर्फा छोटे मोठे व्यावसायिक आपली दुकानदारी थाटतात. महामार्ग हा सतत वर्दळीचा असल्याने येथून सतत भरधाव वेगाने वाहने धावत असतात. शुक्रवार हा बाजाराचा दिवस असल्याने महामार्गावर जास्तीची वर्दळ असते. अशावेळी अपघात होण्याची शक्यता बळावते. भविष्यात अपघाताच्या घटना टाळण्यासाठी व होणारे व्यवसायासाठी अतिक्रमण टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने छोट्या व्यावसायिकांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये