ताज्या घडामोडी

घोडझरी तलावात बुडून पाच तरुणाचा मृत्यू – एकाला वाचविण्यात आले यश

गावंडे परिवारातील चार युवकांचा करुण अंत - सर्व मृतक साठगाव येथिल रहिवासी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

सुधाकर श्रीरामे नागभीड

नागभिड तालुक्यात येत असलेल्या घोडाझरी येथे दुपारी तीन वाजता साठगाव (कोलारी) येथील तरुण पोहण्यासाठी तलावातील पाण्यात उतरले. त्यापैकी जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे सर्व साठगाव येथील रहिवाशी असून बुडून मृत्यू झाल्याचे समजते.

घटनेची माहिती कळताच वन विभाग, पोलिस विभाग आणि तालुका दंडाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ पोलिस विभागाचे पथक, एन डी आर एफ ची मदत घेत असल्याचे सांगितले गेले. सर्व तरुण पोहण्याच्या बेताने तलावातील पाण्यात उतरले आणि आपला जीव गमावून बसले. चिमूर तालुक्यातील सर्व युवक आनंद घेण्यासाठी आले असताना त्यांचे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त लिहेपर्यंत शोध मोहीम सुरु असल्याचे तालुका दंडाधिकारी यांनी एका सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये