ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवनात सारस्व निर्माण करणेसाठी रामाचा आदर्श घ्या – माजी आमदार संजय धोटे 

अनुलोम सोहऴ्यात प्रतिपादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- भगवंत आपल्या चराचरात वास्तव्यास असते,त्याची अनुभुती घेणेसाठी ध्यान मार्ग अवलंबुन भगवंताला पुर्णता समर्पित व्हा,अनुभुती निश्चित प्राप्त होईल.असे प्रतिपादन माजी आमदार संजय धोटे यांनी श्रीराम मुर्ती सोहळ्यात केले.मानव जिवन हे नाशवंत आहे,जिवनात सारस्व निर्माण करायचे असेल तर भगवंताच्या सानिध्यात राहणे गरजेचे आहेत.यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या श्रीराम मुर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन उपरवाही स्थानावर करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

येणाऱ्या २२ जानेवारीला अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांची प्राण-प्रतिष्ठा होत आहे,त्या औचित्याने राजुरा भागात अनुलोम वस्ती मित्र व स्थान मित्रांना श्रीराम मुर्ती प्रदान करण्यात येत आहे.

कुकुडसाथ वस्ती मधिल उपरवाही स्थानावर हा सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश ताजणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अनुलोम या सामाजिक उपक्रमाची कार्यरचणा राजुरा समन्वयक सतिश मुसळे यांनी विशद केली.यावेळी युवकांचे नेतृत्व करणारे, धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ.यांना श्रीराम मुर्ती प्रदान करण्यात

आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय धोटे होते.प्रमुख उपस्थिति युवा उद्योजक निलेश ताजणे, उपरवाही सरपंच सौ गितांजली सिडाम,अणिल कौरासे उप सरपंच,रघु मडावी पोलिस पाटिल,भारतीय मजदूर संघ अंबुजा सीमेंट चे राजेन्द्र लोनगाडगे,पंचफुला काकडे, शंकर गुरकुंटावार,ॲड.मंथनवार ताई, डॉ.सेन,अनुलोम राजुरा समन्वयक सतिश मुसळे,गजानन बुराण,सुयोग कोंगरे,रामकिसन मुसळे, कुणाल पारखी

यांचे सह गावातील तरूण मंडळी, मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन मनोहर कुळसंगे यांनी केले,आभार प्रदर्शन गजानन बुराण यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये