ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने १२५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या माध्यमातून “उडान” या संकल्पनेवर आधारीत उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांच्या हस्ते १२५ सायकलींचे वितरण करण्यात आले. येथील एन.डी. हॉटेलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मंचावर सहाय्यक प्रांतपाल रमा गर्ग, चंद्रपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव, माजी अध्यक्ष डॉ. विजय, सचिन गांगरेड्डीवार, महेश उचके, सचिव कुंजबिहारी परमार उपस्थित होते.

रोटरी क्लबच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तथा विविध क्षेत्रात समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गरजवंतांच्या पंखात बळ भरणाऱ्या रोटरीच्या उपक्रमामुळे अनेकांचे जीवन आनंदमयी झाले आहेत. आता गरीब शालेय विद्यार्थ्यांना उडान उपक्रमांतर्गत सायकलच्या माध्यमातून केलेल्या मदतीमुळे त्यांच्या पंखात बळ भरले गेले आहे. भविष्यात ही मुले गरूड भरारी घेतील असा विश्वास प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे श्रीमती वेणुगोपाल यांनी कौतूक केले. याप्रसंगी, शाळा तथा वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १२५ सायकलींचे वाटप श्रीमती वेणुगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहायक प्रांतपाल रमा गर्ग यांनीही या उपक्रमाचे कौतूक करतांना विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून जागृत नागरिक होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाषणात रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव यांनी रोटरीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती स्मिता जीवतोडे यांनी केले.

आभार सचिव कुंजबिहारी परमार यांनी मानले. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर सुजर वाघ होते. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत खजांची, राम चांदे, डॉ. अशोक वासलवार, मधुसूदन रूंगठा, अरूण तिखे, जितेंद्र दोशी, अशोक हसानी, प्रदीप बुक्कावार, सचिन गांगरेड्डीवार, ॲड. विनायक बापट, अविनाश उत्तरवार, किर्ती चांदे, अजय जयस्वाल, श्रीकांत रेशीमवाले, संतोष तेलंग, महेश उचके, स्मिता जिवतोडे, अजय पालारपवार, अनुपमा भामरी, संजय उपगन्लावार, मिलिंद बोडखे, नविन चोरडीया यांच्यासह अनेक मान्यवर रोटरी सदस्य सहपरिवार, रोट्रेक्टर्स, इनरव्हील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये