ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाची गडचिरोली येथे विभागीय बैठक

लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक २० जानेवारीला गडचिरोली येथे आयोजित केली आहे. सदर बैठक महाराजा सेलिब्रेशन हॉल अॅण्ड लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे होणार आहे. या बैठकीला आजी माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

बैठकीला राज्याचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले अध्यक्षस्थानी राहणार असून, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, नागपूर विभाग प्रभारी तथा प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी केंद्रीयमंत्री विलासराव मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. अनिस अहमद, रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, मारोतराव कोवासे, बंडूभाऊ सावरबांधे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका या दोन सत्रात होणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान विभागीय बैठक होणार असून, दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विभागीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला आजी माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये