ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवावर्गावरच प्रगत भारत निर्माण करू शकतात 

राष्ट्रीय युवा दिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘देशाला दूरदृष्टी असलेले, समर्पित, कर्तव्यदक्ष व ध्येयवेडे सुजाण तरूण तरूणी मिळाल्यास पाहीजे तसा बदल घडवून आणता येतो. या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची संकल्पना स्पष्ट असली पाहीजे. युवावर्गावर विश्वास टाकून त्यांना नेतृत्व दिले गेले पाहीजेत. कारण युवावर्गावरच प्रगत भारत निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा दिना’निमित्त स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी. हाॅल मध्ये आयोजित वकृतव स्पर्धेतील स्पर्धेकांनी 12 जानेवारी रोजी केले.

स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील एन.सी.सी.युनिट, रोव्हर-रेंजर पथक व राष्ट्रीय सेवा योजना (+2 स्तर) पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय युवा दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘युवा वर्ग

प्रगत भारत निर्माण करू शकतात’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात असून त्यात 17 स्पर्धेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.सी. अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले, सहाय्यक रोव्हर लिडर योगेश आदमने व आसीफ शेख उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कॅडेट कोमल शितळे, द्वितीय क्रमांक अंडर ऑफिसर राखी खोडे, तृतीय क्रमांक प्रशिल अंदुरकर तर प्रोत्साहनपर पुरस्कार रेंजर वैष्णवी शिरभाते व साहिल रामगडे यांनी प्राप्त केला.

कार्यक्रमाचे संचालन सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर व अक्षय जबडे यांनी तर आभार अंडर ऑफिसर प्रतिक क्षीरसागर याने मानले. यशस्वीतेकरीता रेंजर नैना गवळी, साक्षी येळणे, हरिओम उईके, आदित्य तामगाडगे, रोव्हर्स रेंजर्स, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाची सांगता ‘नौजवान आओ रे, नौजवान गाओ रे!. या युवा गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये