ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपनयन करणाऱ्या आरोपीस पुणे येथून अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिचे आई- वडील यांचेसह हनुमान गड, कारला चौक, वर्धा राहत असतांना पिडीत मुलगी ही शाळेत जात-येत असतांना तिचेशी ओळख निर्माण करून तिचेशी प्रेमसंबंध निर्माण करून व जवळीक साधली व दि.26.01.2023 रोजी तीला फुस लावून हनुमान गड, कारला चौक, वर्धा येथुन तिच्या पालकांचे कायदेशीर रखवालीतून तिचे अपनयन केले. मुलीच्या वडीलांनी पो. स्टे. रामनगर येथे दि.27.01.2023 रोजी दिलेल्या तक्रारी सदर गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता.

           घटनेपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता.त्यांचा शोध न लागल्यामुळे दि.19.12.2023 रोजी सदर गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला.

       सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपी व मुलीचा सातत्याने शोध घेत असतांना, ते दोघेही भिमा कोरेगाव, पुणे परिसरात किरायाची रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्यांचे शोधार्थ दि.09.01.2024 रोजी पुणे येथे पोलीस पथक पाठविण्यात आले. त्यांनी पुणे शहरातील पो. स्टे. लोणीकंद हद्दीतील भिमा कोरेगाव, रामनगर, वढू खुर्द मध्ये शोध घेतला असता,यातील पिडीत मुलगी व आरोपी हे दोघेही किरायाने रूम घेऊन एकत्र राहत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता, यातील आरोपीने अल्पवयीन पिडीत मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आढळून आल्यामुळे सदर गुन्ह्यात भा. द. वि. चे कलम 376(2)(एन ) व 4,6 पोक्सो ऍक्ट चे कलम वाढ करण्यात आले. आरोपी वृशाल उर्फ ऋषी राजेश मानकर,वय 26 वर्ष राहणार बल्लाळ लाॅन सिंदी मेघे वर्धा, रितसर अटक करून पीडित मुलीसह पुढील तपासकामी पो. स्टे.रामनगर येथे हस्तान्तरीत करण्यात आले आहे.

       सदरची कामगिरी मा. नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा, वर्धा, पो. उप नि बालाजी लालपालवाले यांचे मार्गदर्शनात स. फौ. निरंजन वरभे,नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे,शबाना शेख,अनुप कावळे यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये