ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅकच्या धडकेत एका विद्यार्थ्यांनीची जागीच ठार

नेवजाबाई हितकारीनी कॉलेजच्या समोरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ट्रकच्या धडकेत एक विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज दिनांक:१२/१/२०२४ ला सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली आहे.
मृतक युवतीचे नाव समीक्षा संतोष चहांदे वय वर्ष १७ असे असून मृतक युवती ही मालडोंगरी येथील रहिवाशी आहे.

समीक्षा ही आंबेडकर कॉलेज इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असून कॉलेज मध्ये जात असतांना धान्य वाहतूक करणाऱ्या CG 08 AE 9972 या ट्रक ने समीक्षाच्या सायकलला मागून धडक दिला ज्यात ट्रकचे चाक शरीरावरून गेल्याने समिक्षाचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना ही नेवजाबाई हितकारीनी कॉलेजच्या समोर काही अंतरावर घडली आहे.


सदर रोड हा वरदळीचा असून या ठिकाणी बाजार समिती चा बाजर तसेच दोन्ही बाजूने कॉलेज आहेत. परंतु रोड वर अतिक्रमण असल्याने छोटे मोठे अपघात नेहन घडतं असतात परंतु आज ११.३० वाजता ही घटना घडली.

समीक्षाच्या पच्छात्य आई बाबा बहीण भाऊ असा लहानगा परीवार आहे.कुटुंबातील मोठी मुलगी गेल्यामुळे चहांदे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
ड्रायव्हर चे नाव मनोज रामफल मरस्कोल्हे वय 21 राहणार समनापुर मध्य प्रदेश अस असून त्याला पोलिसांनी कलम भा.द.वी. 279,304(A)184 मो.वा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे

घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये