ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सांगता समारोह थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन /रेजींग डे (सप्ताह) साजरा करण्यात येते असून त्यादरम्यान दिनांक 04.01.2024 व दिनांक 05.01.2024 रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथे पोलीस विभागातील सर्वच शाखाचे कामकाज व जनतेस त्याचा उपयोग याकरीता वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्यामध्ये सायबर सुरक्षा, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलीस वाहने, डॉग स्कॉड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, अंमली पदार्थ जागृती, दामीनी पथक / पोलीस काका व पोलीस दीदी, होम गार्ड, फॉरेन्सीक व्हॅन टूल किट, बॅन्ड पथक, दंगल नित्रयण साधने यांचे एकूण 16 स्टॉल लावण्यात आले होते. सदर प्रदर्शनी करीता वर्धा जिल्ह्यातील शाळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून जिल्हयातील सर्वच तालूक्यांमधील वेगवेगळ्या शाळांमधून 6700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह हजेरी लावली. तसेच शहरातील नागरीकांनी हिरहीरीने सर्व स्टॉल्स्ला भेटी दिल्या.

पोलीस प्रदर्शनी सांगता समारंभ दि. 05.01.2024 रोजी संध्याकाळी 06.00 वा. ते 07.00 वाजता दरम्यान पोलीस मुख्यालय, वर्धेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा लाभले तसेच मा.श्री. रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र, मा.श्री. रामदास आंबटकर, आमदार, विधान परीषद, मा. श्री. दादाराव केचे, मा.श्री. समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट विधानसभा क्षेत्र, मा.डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा क्षेत्र, मा. श्री. राहूल कर्डीले, (भाप्रसे), जिल्हाधिकारी, वर्धा यांचे प्रमूख उपस्थीतीत संपन्न झाला.

या दोन दिवसीय प्रदर्शनी दरम्यान वर्धा जिल्ह्यातील UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या 250 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मा. प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते अमली पदार्थ विरोधी जागृती करण्याचे हेतूने मोहीम हाती घेण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे यशाकरीता मा. श्री. नूरूल हसन (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, मा. डॉ. सागर कवडे (म.पो.से) अपर पोलीस अधीक्षक, वर्धा पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा., राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, पो. मू. वर्धा स.पो.नि. लक्ष्मण लोकरे, कल्याण शाखा, स.पो.नि. विनीत घागे, वाहतूक शाखा, स.पो.नि. संदीप कापडे, सायबर सेल व सर्व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये