ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनसुविधा निधी अंतर्गत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा निधी अंतर्गत दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळणार आहे. या निधितून १४ गावातील विकासकामे केली जाणार आहे.

     चंद्रपूर मतदार सघांचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली आहे. विविध विभागांतर्गत मोठा निधी त्यांची चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागासाठी उपलब्ध करुन दिला असून या निधीतून येथील विकासकामे केल्या जात आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात अभ्यासिका, पांदण रस्ते, समाज भवन, व्यायमशाळा, सौदर्यीकरण यासह मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या आहे.

दरम्यान जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा निधी अंतर्गत चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामिण भागाच्या विकासासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून कोसारा, चारगाव, मोठा मारडा, चोराळा, ताडाळी, दाताळा, देवाळा, धानोरा, नागाळा, पांढरकवढा, मोरवा, म्हातारदेव, वेंडली, सोनेगाव या गावात मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये