ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती म्हणजेच ३ जानेवारी हा दिवस दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त ‘भारतीय महिलांच्या उत्थानामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान’ या विषयावर विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवतीचे समाजशास्त्र विभाग, मराठी विभाग, इतिहास विभाग आणि सांस्कृतीक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात, विद्यार्थ्यांनी सदर विषयावर त्यांचे मत-मतांतरे अभिव्यक्त करून, स्त्री मुक्तीच्या दिशेने क्रांतिज्योती सावित्रीबाईं फूले यांनी केलेल्या कर्तृत्वाचे यथोचित अशी अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि सोबतच त्यांनी तत्कालिन समाजव्यवस्था मधील स्त्रियांचे स्थान व स्थिती याबद्दल आपल्या शंका-कुशंका आयोजकांसमोर ठेवल्या. डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या या विषयावरील शंकेंचे निराकरण करून, विद्यार्थ्यांसमक्ष सावित्रीबाईं फूले यांचे कर्तृत्व आणि त्याग यासंदर्भात विस्तृत उहापोह केला. तर प्रा. गजानन राऊत यांनी तत्कालिन काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती आणि दर्जा याचे सविस्तर वर्णन करून सावित्रीबाईं फूले यांच्या कमिगिरीचे सविस्तर विवेचन विद्यार्थ्यासमोर प्रस्तुत केले.

या चर्चासत्रात अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक या चर्चासत्राच्या अध्यक्षा सदर महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी केले. सोबतच आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी असे उपक्रम घेण्याचा विश्वास सुद्धा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

या चर्चासत्रात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हा उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये