ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरण चंद्रपूर परिमंडळात क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट

       महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जंयती महिलामुक्ती दिन तथा बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. आद्य शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस सहा.महाव्यवस्थापक श्री.रामचंद्र वैदकर यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

     याप्रसंगी,वरिष्ठ व्यवस्थापक सुशिल विखार, उपविधी अधिकारी शैलेंद्र फुले, उपकार्यकारी अभियंता श्रीमती कांचन झेले, व्यवस्थापक (वि व ले )सचिन जीवणे, भूपाल बेडेकर, प्रदीप जिंदे, सहा अभियंता – अमोल पिंपळे व नगराळे, ताजने, शेडामे, खोंड, चाचेरकर व रोशनी वंजारी,शारदा नारे, सविता भजभूजे, उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली अर्पण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये