हिट अँन्ड रन नव्या कायद्या विरोधात जय संघर्ष संघटनेचा मोर्चा
नंदू पढाल यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्र शासनाने तयार केलेल्या नव्या हिट अँन्ड रन कायद्याच्या विरोधात शहरातील जय संघर्ष वाहन चालक- मालक संघटनेतर्फे नंदू पढाल यांच्या नेतृत्वात शहरातील नाग मंदिरा पासून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदर संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून सदर अन्यायकारक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
वाहन -चालक हे पाच ते दहा हजार एवढ्या कमी पगारावर काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असतात. नव्या कायद्यात अपघात झाल्यानंतर वाहन चालकांना दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्यामुळे या कायद्यामुळे चालकांचे आयुष्य तथा त्यांचे कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे जाचक असलेला हा कायदा रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर मोर्चा नाग मंदिर पासून काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्याने हा मोर्चा निघून बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारा जवळ मोर्चाची सांगता करण्यात आली. त्यानंतर संघटनेतर्फे तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात संघटनेचे तालुकाध्यक्ष रुपेश वैद्य, उपाध्यक्ष प्रशांत झिलपे, तालुका सचिव गोलू गोहने, विनोद उपगन्लावार, रतन सुखारे, योगेश गाडगे, रवी खारकर, प्रदीप मोहितकर, आरिफ शेख, रोहीत चिडे ,अक्षय बालपने तथा संघटनेचे तालुक्यातील सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.