गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नविन वर्षे निमीत्य वर्धामध्ये येणारी देशी – विदेशी दारू कारसह वर्धा उपविभागीय पथक व स्था.गु.शा यांनी नाकेबंदी करून पकडली विदेशी दारू

वर्धा उपविभागीय पथकाने 15 दिवसात मोठे दारू वाहतुक करनारे 6 चारचाकी वाहन पकडुन आरोपीतांच्या आवळल्या मुसक्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 30/12/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी यातील आरोपीतांनवर रेल्वे कॉसींग जवळ पुलगाव ते वर्धा, रोड वर्धा येथे नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे 1) कोहीनूर संजय उके रा. आयुवेर्दीक सावंगी रूग्नालय जवळ, सालोड हिरापुर, वर्धा 2) दर्शन हरीभाउ फुंडे रा. गणेश नगर, वर्धा यांना दिसताच वाहन थांबवुन पसार झाले मौक्यावरू 1) एक चारचाकी वाहन क्र एम.एच. 06 ए.बी 3025 सिल्वर रंगाची होन्डासिटी कंपनीची किंमत अंदाजे 6,00,000/- रू त्या मध्ये रॉयल स्टॅग कंपनिच्या, ऑफीसर चाईस ब्लु, ऑफीसर चाव्हाईस, ओल्ड मंक, रॉयल चालेन्ज, टॅगों कपंनीच्या देशी दारूच्या अश्या वेग वेगळ्या कपंनीच्या देशी/विदेशी दारूच्या 12 पेटया की. की. 1,60,400 रू 2) एक VIVO कपंनीचा लॉक असलेला टचपॅडवाला गोल्डन रंगाचा मोबाईल त्या मध्ये जिओ कपंनीचे सिम की. 15,000/- रू असा जु की 7,75,400 /- चा माल अवैध्यरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.

पोलीस स्टेशन सावंगी मेघे, वर्धा येथे पसार आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक / 2023 कलम कलम 65 अ ई, 77 अ, 83, म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सावंगी मेघे येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के मकेश्वर सा. व पो.नि. संजय गायकवाड, स्था.गु.शा वर्धा याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खॉन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, तसेच स्था. गु.शा.वर्धा येथील पोउपनि. प्रकाश नागापुरे पो.हवा गजानन लामसे,, रितेश शर्मा, गोपाल बावनकर, मंगेश आदे तसेच सायबर सेल वर्धा चे दिनेश बोथकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये