चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
शिवसेना तालुका प्रमुख उमेश गोलेपल्लीवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली – मागील अनेक दिवसांपासून संततधार अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले असून पावसाळा लागल्यापासून तीन ते चार वेळा ढगफुटी सदृश्य पावसामुळे चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उमेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यासह सावली तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने अंत्यत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांची खरीप पिके वाहून गेली असून, जनावरे, गोठे, शेतातील बांध यांचेही नुकसान झाले. नागरी भागात पाणी शिरल्याने घरगुती साहित्य व व्यापारी आस्थापनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता सरसकट शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कर्जाची स्थगिती व व्याजमाफी देण्यात यावी, तसेच व्यापारी व नागरिकांना स्वतंत्र निधीतून दिलासा देण्यात यावा, ही फक्त नैसर्गिक आपत्ती नसून, आयुष्यावर झालेला आघात आहे.
यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ निर्णय घेत जिल्हा ओलादुष्काळग्रस्त करावा व नागरिकांना आधार द्यावा, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख उमेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.