ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिमूर तालुक्यात एकाच दिवशी अपघातांचे थैमान!

विविध ठिकाणी अपघातात नऊ जखमी ; 4 गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

चिमूर तालुक्यात शुक्रवार दिवस हा अपघात दिवस ठरला असून आज चक्क तेरा व्यक्ती विविध अपघातात जख्मी झाले असून अकरा व्यक्तीवर चिमूर उपजील्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे.

चिमूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या लोखंडया पुलाजवळ मिनझरी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन दुचांकीस्वर गंभीर जख्मी झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 31 FC 3690 मिंनझरी वरून चिमूर कडे विद्यार्थी व प्रवासी घेऊन राष्ट्रीय महामार्गाने येत असताना लोखंड्या पुलाजवळ दुचाकी क्रमांक एम एच 34 व्हि 4146 ला धडकली त्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वर शरद शंकर आदे वय 25. सोमेश्वर लक्ष्मण पंचवटे वय 49 दोघेही राहणार हिरापूर् गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता रवाना केले आहे.

तर शेगाव येथून मयतिच्या कार्यक्रमाकरिता जात असताना चिमूर नेरी मार्गावर पोल्ट्रीफार्म जवळ टाटासुमो MH -26 L 1667 या गाडीचा राळ तुटल्याने टाटा सुमो गाडी पलटी झाल्याने ड्रायव्हर सोबत अकरा व्यक्ती जख्मी झाले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना कळताच घटनास्थळावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी घटनस्थलवर पोहचून पंचनामा केला.

जखमींना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले. उपस्थित वैधकिय अधीकांर्यानी प्राथमिक उपचार करून हिरापूर येथील दोन रुग्णांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले. व अकरा रुग्ण चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील कार्यवाही पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक निलेश चवरे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये