ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. पल्लवी कोटरंगे क्रॉस कंट्री स्पर्धेत सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाची कु. पल्लवी शंकर कोटरंगे या विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री या स्पर्धेत चतुर्थ स्थान प्राप्त केला. असुन सदर स्पर्धा सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आली होती.

शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सतेंद्रर बलवंत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये