ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.शाळा लालगुडा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना पंचायत समिती अंतर्गत गडचांदूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे दिनांक :२० डिसेंबर २०२३ ला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

संत गाडगे बाबा हे समाजाचे शिक्षक असून समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान दूर करून लोक शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील खुळचट कल्पना, अस्वच्छ राहणीमान सोडून स्वच्छतेचा पुरस्कार करण्याचे समाजाला आयुष्यभर धडे दिले.असे शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी या कार्यक्रमातून विद्यार्थी तथा ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी गावामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांकडून ग्रामसफाई करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची स्वच्छतेविषयक घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाला गावचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश धुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे , उपाध्यक्ष वर्षा कोडापे, अंबुजा फाउंडेशनचे श्री मडावी सर, शिक्षक, विद्यार्थी तथा समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये