Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मयोगी गाडगे महाराज यांना आदरांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून गाडगेबाबा यांच्या ग्राम स्वच्छते विषयी कार्याची माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे पर्यवेक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी सुद्धा गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसाठी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची संचालन बाळकृष्ण मरस्कोले यांनी तर आभार सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजेश मांढरे,नामदेव बावनकर, जी एन बोबडे, आर एस वासेकर, श्रीमती शेंडे, माधुरी उमरे,गोपमवार, मेश्राम, कोंगरे यांचेसह शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी शशिकांत यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये