Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनवावे

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनत होत ते तुम्ही आता हिंगणघाटला बनवण्याच्या उप मुख्यमंत्री साहेबांनी अशी घोषणा केली व निर्णय घेतला आहे उप मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले की वर्धेमध्ये दोन मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे हिंगणघाट इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनवण्यात येईल ह्याच आधारावर यांनी निर्णय घेतला व घोषणा केली पण साहेब हे दोन्ही खाजगी मेडिकल कॉलेज आहे हे दोन्ही शासकीय मेडिकल कॉलेज नाही आहे, तुम्ही हिंगणघाट इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनवण्याच्या जे निर्णय घेतला ते चुकीच्या निर्णय घेतला आहे साहेब तुम्ही वर्धे जिल्ह्यातली जनतेसोबत अन्याय केला आहे.

जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्यातील व ग्रामीण क्षेत्रातील लोक शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्यात वर्धेत उपचारासाठी येतात जिल्ह्यातला हा मेन शासकीय सामान्य रुग्णालय दवाखाना असून इथं उपचाराची सोय नाही मोठे सर्जन डॉक्टर्स इथे आहे नाही शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्यातले डॉक्टर्स पेशंटला वर्धेमध्ये असलेले सावंगी सेवाग्राम खाजगी दवाखान्यात पाठवते, आणि तिथे लोकांना खूप खर्च करावा लागतो बिना पैशाने खाजगी दवाखान्यात उपचार होत नाही हे गोष्ट शासन व प्रशासनाला पण माहित आहे, हा वर्धे जिल्ह्यातला मोठा शासकीय सामान्य रुग्णालय दवाखाना आहे पण इथे आरोग्य उपचार सुविधा हे उपलब्ध नाही का बरं समाजसेवक लोकांनी बरेच संघटने बरेच वर्षापासून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री साहेबाला आरोग्य मंत्री साहेबाला निवेदन देतात. पण कोणतीही निवेदनावर लक्ष का बरं देत नाही. का बरं निवेदनावर दुर्लक्ष करतात.

आमची संघटनेने जिल्ह्यातली जनतेच्या विचार करून शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्यामध्ये चांगली आरोग्य सुविधा वर्धे जिल्ह्यातले जनतेला मिळेल म्हणून आम्ही ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ची मागणी शासन व प्रशासनाकडे केली शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्याला लागून वर्धेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनेल तर 24 तास मोठे सर्जन डॉक्टर सामान्य रुग्णालय दवाखान्यामध्ये उपस्थित राहील व वर्धा जिल्ह्यातील सर्व आम सामान्य गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळेल.

आमची संघटनेन शासन व प्रशासनाला याच्या अगोदरचे निवेदनामध्ये सांगितलं की शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्याला लागून जुनी जिल्हा परिषद ची जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनवण्याच सांगितलेलं आहे पण शासन व प्रशासनाने आमच्या निवेदनावर आंदोलनावर काही लक्ष दिले नाही, आमची संघटना शासन व प्रशासनला नम्र विनंती करते की आमच्या विषयावर विचार करून पूर्ण पणे एक वेळा निर्णय घेऊन वर्धेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय सामान्य रुग्णालय दवाखान्याला लागून जुनी जिल्हा परिषद ची जागेवर वर्धेत बनला पाहिजे अशी निवेदनातून विनंती केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये