Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदारांच्या निलंबनाविरोधात महाविकास आघाडी कडून देऊळगाव राजा येथे भाजप सरकारचा निषेध!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

         येथील बस स्थानक चौकात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 146 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना- उबाठा गट आणि घटक पक्ष या महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

       संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी करत विरोधकांनी गदारोळ घातला होता. दरम्यान लोकसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षातील 146 विरोधी खासदारांना निलंबित केले. सदर निलंबनाच्या विरोधात देऊळगाव राजा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “तानाशाही नही चलेगी, हुकूमशाही सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा देऊन भाजप सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी या निषेध आंदोलनात काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मनोज कायंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,शिवसेना उद्धव गटाचे गोविंद झोरे,सेवा दलाचे तालुका अध्यक्ष गजानन तिडके, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विष्णू भाऊ झोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष विजू खांडेभराड, तालुका सचिव जहीर पठाण, काँग्रेसचे रमेश कायंदे, हनिफ शाह, लक्ष्मण कव्हळे,सुभाष दराडे, इक्बाल कोटकर, इस्माईल बागवान, रफिक भाई, प्रा अशोक डोईफोडे,राष्ट्रवादीचे अजमत खान, शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, शेख राजू, जावेद खान,मुबारक शेख, गजानन दंडे आम आदमी पार्टीचे राजाराम खांडेभराड, विजय जाधव, मंगेश तिडके, सत्यनारायण पावले, अक्रम शेख, मुबारक पठाण, राहुल घाटे, पंडित राजे,मुन्ना ठाकूर,रफिक भाई,रउफ भाई,आदींची उपस्थिती होती. दरम्यान आंदोलकांच्या घोषणाबाजीने बस स्थानक चौक दणानून गेले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये