ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गवराळा येथे जगन्नाथ महाराज मंदिर निर्माण भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून होणार मंदिराची उभारणी - जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील गवराळा येथील ताठे लेआउट मधील प्रस्तावित असलेल्या जगन्नाथ महाराज मंदिर निर्माण कार्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील जेष्ठ दानशूर नागरिक शामराव नक्षीने यांचे हस्ते नियोजित जागेवर कुदळ मारून मंदिर निर्माण चे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रभागातील जेष्ठ नागरिक महादेव उरकुडे, निळकंठ आत्राम,बबन जीवतोडे, सूर्यभान परचाके, महादेव डोंगे, शामराव खापणे, बंडू परचाके, पांडुरंग कोयचाडे, बाबाराव निखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मंदिर निर्मितीसाठी येथील ताठे लेआउट मधील जागा जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाला उपलब्ध करून देण्यात आली.या जागेवर जगन्नाथ महाराजांचे भव्य मंदिर निर्मितीचा मानस असून परिसरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून लवकरच या मंदिराची उभारणी होईल असा विश्वास सदर मंडळातर्फे यावेळी व्यक्त करण्यात आला.भोजनदानाने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी भक्तीतून सामाजिक संघटन व एकोपा राखण्याचा संकल्प जगन्नाथ भक्तांनी केला. सदर कार्यक्रमाला तन-मन-धनाने सहकार्य करणारे जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील भावीक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये