ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालच्या बॉक्सर कुमारी दुर्गेश्वरी आत्रामला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        स्थानिक भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील कुमारी दुर्गेश्वरी सतीश आत्राम वर्ग १२ वी कला, या विद्यार्थिनींने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले. जूनियर गट राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा, शेगाव येथे दिनांक ९ जून ते ११ जून २०२५ रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी दुर्गेश्वरी आत्राम हिने आपल्या बॉक्सिंग खेळ कौशल्याचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करून, या बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले.

या बॉक्सिंग खेळाडू च्या कामगिरी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती चे नाव लौकिक केले, खेळाडूंनी बॉक्सिंग क्षेत्र निवडून त्यात पराक्रम करून आपल्या जिल्ह्याचे व भद्रावती शहराचे नाव लौकिक केले. दुर्गेश्वरी आत्राम हिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, क्रीडा शिक्षक प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे, भद्रावती बॉक्सिंग प्रशिक्षक लता इंदूरकर (तिवारी), रोहन मोटघरे तसेच चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना, भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.

कुमारी दुर्गेश्वरी हिने ज्युनिअर गट राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव, अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. मालेकर, प्रा. कापगते, प्रा. लांबट, प्रा. दाते, प्रा. बेलगावकर, प्रा. खोके, प्रा. बैरम, प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. पारेल्लवार, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, भद्रावती तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, एडवोकेट मिलिंद रायपुरे, डॉ. दिलीप बगडे, श्री विजय लांबट, श्री दिलीप मोडक, यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये