तक्षशिला प्रशिक्षण केंद्रात सामाजिक समता सप्ताह उत्साहात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत तक्षशिला स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला सामाजिक समता सप्ताह उत्साहात पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या तक्षशिला स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात अनुसूचित जाती / जमातींच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत अनिवासी पोलिस व मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण चालविले जाते. या अंतर्गत दिनांक ११ एप्रिल ला महात्मा फुले जयंती निमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्राच्या संचालिका तक्षशिला चंद्रगडे यांनी मार्गदर्शन केले तर दिनांक १२ एप्रिल रोजी १२ तास अभ्यासमालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. दिनांक १३ एप्रिल रोजी वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा पार पाडण्यात आला.
सदर सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण येरमे, अविनाश रामटेके, आंबेडकरी विचारवंत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका तक्षशिला चंद्रागडे होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमर जिल्हेकर, मिलिंद ठेंगरे, मंगेश गौरकर यांची उपस्थिती होती. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर, संघर्षावर प्रकाश टाकला. व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली खोब्रागडे हिने तर विशाल भोगे याने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.