ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील मुख्य मार्गावर संडे मार्केटचे अतिक्रमण ; वाहतुकीची कोंडी

अतिक्रमणाकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाचे तसेच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट

      शहरातील मुख्य गांधी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मार्गावर संडे मार्केटने अतिक्रमण केल्याने वाहतुकीची  कोंडी झाली आहे. संडे मार्केटच्या या अतिक्रमणाकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाचे तसेच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

     आझाद बगीच्याचे बाजूला सिटी हायस्कूल ते धनराज प्लाझा या मार्गावर प्रत्येक रविवारी संडे मार्केट लागायचे. मात्र, या मार्गावरील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे या मार्गावर संडे मार्केट लावू नये असे फर्मान महापालिकेने दिले होते.

       मात्र, आता तेथील संडे मार्केट मुख्य मार्गावर आले आहे. गांधी चाैक ते जटपुरा गेट या शहरातील एकमेव मुख्य मार्गावर मागील दोन रविवार पासून संडे मार्केटची दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे.

       त्यामुळे, ऑटो तसेच इतर वाहनांना मोठा अडथळा सहन करावा लागत आहे. तसेच या मुख्य मार्गावर मोठे नामांकित दवाखाने असल्याने रुग्णवाहिका नेण्यास मोठा अडचणीचा सामना करावा लागतो आहे. तसेच इतर नागरिकांना जाणे- येण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.

           त्यामुळे, या संडे मार्केटला इतरत्र जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी, मुख्य मार्ग तात्काळ मोकळा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये