ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीस गेलेले १४ मोबाईल व दुचाकी मुळमालकांना परत

गोंडपिपरी पोलिसांकडून २.४० लाखांचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीत विविध ठिकाणी चोरीस गेलेले १४ मोबाईल फोन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गोंडपिपरी पोलिसांनी तपासादरम्यान हस्तगत करून संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल फोन व दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी विविध दिशांनी चौकशी करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती १४ मोबाईल फोन व एक दुचाकी, असा एकूण ₹२,४०,००० किमतीचा मुद्देमाल लागला.

हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित फिर्यादींच्या ताब्यात परत करण्यात आला. चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त करत गोंडपिपरी पोलिसांचे आभार मानले.

गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कार्यक्षम तपासामुळे चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात यश आले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण झाला असून, गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचेही या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये