जनसेवा हिच ईश्वरीय सेवा_आमदार देवराव भोंगळॆ
गोंडपिपरीत पून,संगमवार यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
सामान्यांची सेवा ईश्वरीय कार्य आहे. हेच ब्रीद घेत आपली वाटचाल सुरु आहे. आपण स्वतः हे कार्य करतांना आमचे समर्थक देखील याच वाटेवार आहेत, याचा अतिशय अभिमान आहे. गोंडपिपरी येथील राकेश पून, निलेश संगमावर यांनी सुरु केलेले जनसंपर्क कार्यालय हे सामान्यांचा सेवेचे केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.
गोंडपिपरी येथील नवीन बसस्थानक परिसरात राकेश पून, निलेश संगमवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करतांना ते बोलत होते.
गोंडपिपरी येथे भाजपचे महामंत्री निलेश संगमवार, भाजयूमोचे तालुकाध्यक्ष राकेश पून आणि त्यांचे बंधू युवा व्यावसायिक प्रशांत पुन यांनी नव्याने सुरू करत असलेल्या यांच्या जनसंपर्क कार्यालय, PNR व्यावसायिक ग्रुप तसेच फिनो पेमेंट्स बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, बबन निकोडे, वैभव बोनगिरवार, गणेश मेरुगवार, प्रवीण धोडरे, सुहास माडुरवार, प्रकाश रापलवार, सचिन चिंतावार, अनिल झाडे, राहुल चौधरी, दत्तू धुडसे, संजय कोमावार, विजय पेरकावार, गणेश डहाळे, संदीप पोरकर, सुनील विरुटकर, दिवाकर फलके, सुनील वेगिनवार, मनोज नरशेट्टीवार , पुरुषोत्तम वाघ, गौरव गोणपल्लीवार, मारोती अम्मावार, सुरेश रागीट, सचिन भोयर, अजय राठोड, प्रफुल घोटेकर, अमोल मोरे, कार्तिक गोण्लावार, स्वाती वडपल्लीवार, अरुणा जांभुळकर, कोमल फरकडे, सुरेखा कोंडापल्लीवार, रंजना रामगिरीकर, वनिता देवगडे, रितू वेगनवार, तेजस्विनी भगत यांचेसह संगमवार व पून परिवारातील सदस्य तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



