आयुष्याच्या सायंकाळी समाजसेवेची धडपड
विविध उपक्रमांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा ; तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे (२१ ऑगस्ट) औचित्य साधून गोंडपिपरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वृक्षारोपण, वृद्धांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करून ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. आयुष्याच्या सायंकाळी समाजसेवेची धडपड करणाऱ्या, मनाने तरुण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
गोंडपिपरी येथील कन्या माध्यमिक विद्यालय सभागृहात आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शन व सन्मान समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ तालुकाध्यक्ष सुरेश चौधरी होते तर प्रमुख उपस्थिती तहसीलदार शुभम बाहकर, बबन पत्तीवार धाबा, विलास माडुरवार भंगाराम तळोधी, विवेक गोनपल्लीवार भंगाराम तळोधी , सुहास माडरवार, राजीवसिंह चंदेल, तूकेश वानोडे, एड. सचिन फुलझेले, संघाचे तालुका सचिव खेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सुरेश वायकोर यांनी केले तर आभार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश काळे यांनी मानले.
कार्यक्रमाला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. आयोजन करिता राजू बट्टे, बागेश्वर गुडपल्ले, सुरेश वायकोर , प्रकाश काळे, मुरलीधर भोयर, बाळकृष्ण पुलगमकर, किशोर पद्मगिरीवार, नरेंद्र गनमुक्कलवार, केशव खेवले, महादेव चौथाले, प्रल्हाद कन्नाके, पत्रू बक्षी, गोपाळा खेकारे, प्रदीप बोनगीरवार, पुरुषोत्तम वाघ, वासुदेव सातपुते, उमाकांत खेवले यांनी परिश्रम घेतले.
*वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व बक्षीस वितरण*
ज्येष्ठ नागरिक संघाचे वतीने गोडपिंपरी तहसील व पंचायत समिती परिसर, वीज वितरण कार्यालय परिसर, व कन्या माध्यमिक विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून रोपट्यांना ट्री गार्ड सुद्धा लावण्यात आले.
*आधारकाठीचा आधार*
वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या २० ज्येष्ठ नागरिकांना शाल श्रीफळ व आधारकाठी देऊन सन्मानित करण्यात आले.
*यशस्वितांचा सन्मान*
गोंडपिपरी तालुक्यातील दहावी, बारावी मध्ये यशस्वी झालेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना व त्यांचे आई-वडिलांना रोख रक्कम व शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले.



