ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथे नशामुक्तीअभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देऊळगाव राजा च्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा महा अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी देवकला दिदी यांनी नशिल्या पदार्थाचे दुष्परिणाम सांगितले, विद्यार्थ्यांनी नशिल्या पदार्थापासून अलिप्त रहावे असे आवाहन केले, ज्योती भोरे यांनी मोबाईल चे दुष्परिणाम सांगितले विद्यार्थ्यांनी मोबाईल चा वापर केवळ अभ्यासासाठी करावा असे सांगितले, याप्रसंगी ज्योती चौधरी, टेंभुरकर, सुभाष भाई , सपाटे सर, प्रा अशोक डोईफोडे, तथा इतर उपस्थित होते,
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्ती प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



