ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते थाटात उदघाटन

ग्रंथदिंडी, वेशभूषा, लेझीम पथकाने वेधले नगरवासीयांचे लक्ष

चांदा ब्लास्ट

मूल नगरीत पहिल्या महिला साहित्य संमेलनाचा अद्भुत सोहळा

            झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मुल यांच्या वतीने पहिल्यांदाच पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन राष्ट्रमाता जिजाऊ नगरी बालविकास प्राथमिक शाळा मुल येथे रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 ला पार पडले.

संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांचे उपस्थितीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते उद्घाटन,प्रा. रत्नमाला ताई भोयर यांचा प्रातिनिधीक कवितासंग्रह हीरदयातील खपली व सुनिता बुटे यांच्या मनभावना कवितासंग्रहाचे प्रकाशन तसेच झाडीबोली महिलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

              या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नवभारत विद्यालयपासून गांधी चौक ते बालविकास प्राथमिक शाळेपर्यंत निघणाऱ्या ग्रंथदिंडीत लोककला व लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा, लेझीम, बँडपथक, कवायती आणि वैशिष्ट्यपूर्ण झाकी प्रदर्शित करण्यात आली. मूल नगरीतील शिक्षक, सर्व कर्मचारी व विद्यार्थी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. झाडी गौरवासाठी शाहीर नंदकिशोर मसराम व गायिका विद्या कोसे यांच्या स्वरांची जुगलबंदी रंगली आहे.

            दुसऱ्या टप्प्यात लोकगीते आणि स्त्री साहित्य यावर प्रकाश टाकण्यासाठी डॉ. विशाखा कांबळे नागपूर, डॉ. कल्पना नरांजे नागपूर व रणरागिनी मंचाच्या अध्यक्षा संगीता बढे वर्धा यांचा परिसंवाद पार पडला. तिसऱ्या टप्प्यात झाडीची बहिणाबाई ज्येष्ठ साहित्यिक अंजनाबाई खुणे वडेगाव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन रंगले. त्यात राज्यभरातील अनेक कवयित्रींचा सहभाग होता . याच साहित्य संमेलनात झाडीपट्टीतील साहित्यिकांचा व झाडीबोलीच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले.

           मूल नगरीत झालेल्या घातलेल्या वैविध्यपूर्ण महिला साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्यिक व साहित्य रसिक, आमंत्रित मान्यवर व नागरिकांनी उपस्थिती होती . संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आयोजन मंडळाने अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये