ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांना घेत नागपुरात धरणा आंदोलन

महाराष्ट्र राज्यातील ऑटो चालक मालक संयुक्त महासंघातर्फे ११ डिसेंबर आयोजन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्यातील ऑटो चालक मालक संयुक्त महासंघातर्फे ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांना घेवून शासन दरबारी आवाज बुलंद करण्याकरिता मागण्यांची पुर्तता करण्याकरिता नागपूर येथे सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर दि. ११ डिसेंबर २०२३ रोज सोमवारला सकाळी ११. ०० वाजता स्थळ – यशवंत स्टेडिअम, धंतोली, नागपूर येथे धरणा आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे.
ऑटोरिक्षा चालकांवर होत असलेल्या धरणा आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील ऑटोरिक्षा चालकांनी दि. ११ डिसेंबर ला आपला एक दिवस व्यवसाय बंद करुन या धरणा आंदोलनामध् ये मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्त महासंघातर्फे महासचिव यांनी केले आहे. महाराष्ट्र ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र खांडेकर, महाराष्ट्र ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, संघठन प्रमुख विनोद चन्ने, जहीर शेख, जाकीर शेख, कुंदन रायपूरे, बंडू भगत, अनिल मिसाळ, किरण मस्कावार, रवी आंबटकर, सुरेश क्षिरसागर, रमेश मुन, राजु मोहुर्ले, परमेश्वर सरकार, दिलीप ढवळे, परशुराम तुराडे, खुशाल आंबटकर, मंगेश चवरे, प्रमोद वेरूळकर, अंकूश कौराते, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, महेश ढेकरे, जनार्धन गुजेकर अरविंद उमरे, राकेश पवार, बबन टोंगे, अविनाश उकेकर, खुशाल साखरकर, रमेश वझे, विलास बावणे यांनी कळविले आहे.
ऑटोरिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्या
१. घोषित झालेले ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबजावणी झालीच पाहिजे.
२. ऑटोरिक्षाचे खुले (मुक्त) परमिट वाटप बंद झालेच पाहिजे.
३. वाहतूक पोलीस मार्फत होणारी फोटोशुट ई-चालन पध्दत रद्द करा.
४. ऑटोरिक्षा चालकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावे. (जसं पदवीधर व शिक्षक मतदारसंघ)
५. ऑटोरिक्षा चालकांवर लावलेला वाढीव दंड कायदा रद्द करण्यात यावा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये