ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे घरफोडी : अज्ञात चोरट्यांनी एक लक्ष 73 हजार रुपये लांबीले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        घरातील सर्व सदस्य घर बंद करून बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात असलेली एक लक्ष 73 हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना शहरातील विजासन भागात दिनांक 29 ला उघडकीस आली.

सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील विजासन परिसरात राहणारे दैनिक आर डी चे अभिकर्ते संतोष उंबरकर हे आदल्या दिवशी काही कामानिमित्त आपल्या कुटुंबीयासह चंद्रपूर येथे गेले होते. त्याच रात्री संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरात ठेवून असलेली आरडीची एक लक्ष 73 हजार रुपयाची रोख रक्कम लांबविली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उंबरकर कुटुंब परत आल्यानंतर सदर घटना त्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी श्वान पथक तथा ठसे तज्ञांना पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये