Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्न नागरी पुरवठा विभागाचे स्वस्त धान्य दुकान संलग्नित जाहीरनामे काढा

गावकर्‍याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपना तालुक्यात ९७ स्वस्त धान्य ग्रामीण व शहरी भागात आहेत या भागातील एका भागात दुर्गम ग्रामीण भाग तर उतरेला औधोगिक विकसित पट्टा आहे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गडचांदूर गोदाम व कोरपना गोदाम या ठिकाणावरून शिधा पत्रिका धारकाना शासनाचे सवलतीचे धान्य घर पोहच वाहना मार्फत कंत्राटदार वाहनाने पोहचविल्या जाते यापूर्वी २० २१ मध्ये मोठया प्रमाणात सलंग्न दुकान जोडून वर्षोगणीक एकाच दुकानदारा कडे २ ते ३ दुकान जोडून चालविल्या जात होते तेव्हा जिल्हा स्तरावरून जिल्हयाभर जाहीरनामे काढून पात्र घटकाचे अर्ज मागविण्यात आले.

मात्र, अन्न पुरवठा विभागाचा काम म्हणजे, सरकारी काम साल भर थांब या वाक्या,,,, प्रमाणे अर्ज २० २१ मध्ये मुलाखत व तपासणी २० २२ मध्ये ग्रामसभा २०२३ मध्ये अश्या पध्दतीने राबवित अजून ही पूर्वीचे काही दुकानाचे प्राधिकार मिळालेच नाही ही पुरवठा विभागाच्या कार्यशैली म्हणजे नागरीकाची सनद हेच का नव्याने कोरपना तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकान वर्षाभरापेक्षा अधिक काळापासून सलंग्न जोडून चालविल्या जाते.

यामूळे शेकडोना मिळणारा रोजगार निवडक लोकाना सुगीचा ठरत आहे अन्न पुरवठा विभागाच्या नियमप्रमाणे वेळेवर धान्य पोहचत नाही एकाच दुकानदारा कडे १पेक्षा अधिक दुकानाचा प्रभार असल्याने एका मागून एक वाटप केल्या जाते तालुक्यात अनेक दुकान गैरव्यवहार धान्य अफरातफरी मुळे निलंबन किवा रद प्रशासनाने केले आहे या तालुक्यात मोठी लोकसंख्या व अधिक शिधा पत्रिका असलेली गावे जोडल्यामूळे नागरीकात जाहीरनामे काढून दुकान वितरण करण्याची मागणी नांदा आवाळपूर पिपर्डा वनसडी भोयगाव धामनगाव कोठोडा (बु) बोरगाव (ईरइ ) दुर्गाडी हिरापूर शेरज ख़ु इरई सोनुर्ली ( गाडे ) भारोसा निमनी बाखर्डी नांदगाव सुर्या इत्यादी गावकर्‍यानी मागणी केली आहे.

अनेक ठिकाणी वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी ९७ पैकी १७ दुकान कोरपना तालुक्यात जोडून चालविल्या जात असून ग्रामीण गाव पातळीच्या ग्राम दक्षता समिती फक्त फलकावर दिसून येत असल्याने नागरीकानी जाहीरनामे काढण्याची मागणी केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये