ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात संविधान दिन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे २६ नोव्हेंबर रोनी संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था सचिव धनंजय गोरे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षक शंकर तुराणकर,एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा. आरजू आगलावे,जेष्ठ प्रा. नंदाताई भोयर होत्या.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटना चे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,वामन टेकाम यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सर्वांना शपथ दिली,संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



