Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात घरकुलासाठी आटापिटा

अनुदान मिळाले तर पूर्ण का नाही केले राव अनुदान देऊनही विहित कालावधीत पूर्ण केले नाही बांधकाम?

चांदा ब्लास्ट

विविध योजनेतून घरकुल मिळवण्यासाठी लाभार्थी स्थानिक ग्राम पातळीवरून पंचायत समिती स्तरापर्यंत मंजुरीसाठी अगदी अग्निपरिक्षेतून जाताना दिसतात परंतु घडते उलटेच ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले त्यांनी शासनाच्या विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम न केल्याने तालुक्यातील 134 लाभार्थ्यांना पंचायत समिती प्रशासनाने आदेशित करून घरकुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा अन्यथा मिळालेला घरकुल हप्ता शासनास परत करावा अन्यथा प्रशासकीय पातळीवरून कार्यवाही करण्यात येईल असे आदेश काढण्यात आलेले आहे.

सविस्तर वृत्त असे की गोरगरीब जनतेसाठी शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध घरकुल योजना त्यांच्यासाठी हक्काचा निवारा म्हणून गणल्या जातो शासन स्तरावरून घर नसलेल्या विहित लाभार्थ्या साठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना, सिबरी घरकुल योजना अशा प्रकारच्या विविध योजना लाभलेल्या जातात यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील घरकुल बांधकामासाठी एक लाख 20 हजार रुपये अनुदान कामाचे स्वरूप पाहून चार हप्त्यांमध्ये दिले जाते हप्त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वरती करण्यात येते परंतु मागील आर्थिक वर्षात लाभार्थ्यांना घरकुल हत्या पोटी घरकुलाचे विविध प्रकारचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर दिलेले असताना सुद्धा त्यांनी आपल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले नाही अशा तालुक्यातील 134 लाभार्थ्यांना नोटीस बजावल्या आहेत.

*अशाप्रकारे मंजुरी आहे घरकुल लाभार्थ्यांची*

सद्यस्थितीमध्ये देऊळगावराजा तालुक्यात सन 2021 -22 या आर्थिक वर्षात मध्ये 667 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांना मंदिरात मिळाली होती हेच उद्दिष्ट कार्यप्रणीत होत असल्यामुळे वरील उद्दिष्ट पैकी 455 लाभार्थ्यांना घरकुल सुरू करण्यासाठी विविध कागदपत्राची पूर्तता करून प्रथम हप्ता करीत करण्यात आलेल्या आहे.

याच वर्षातील उद्दिष्ट रमाई आवास घरकुल योजना ते उद्दिष्ट हे एकूण 150 घरकुलाचे होते या सर्व लाभार्थ्यांना अनुदान हप्ताचे वितरण करण्यात आलेले आहेत त्यापैकी 77 घरकुलाचे काम हे पूर्ण झाले असून 73 घरकुलाचे काम चालू स्थितीत आहे 2022- 23 तसेच 2023- 24 चे या वर्षामध्ये घरकुलाचे उद्दिष्ट मागील वर्षातील घरकुलाचे काम चालू असल्यामुळे उद्दिष्ट प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचा कयास काढल्या जात आहे.

*पंचायत समिती बांधकाम विभागाची निष्क्रियता*

पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामांचा तांत्रिक लेखाजोखा सादर करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर तज्ञ इंजिनियरची नियुक्ती शासन स्तरावर केलेले आहे परंतु संबंधित अधिकारी फक्त ग्राम पातळीवर चालू असणाऱ्या विविध वित्त आयोगाकडून चालू असलेल्या बांधकामाच्या बावीकडे आपले लक्ष केंद्रित करतात त्यामध्ये ग्राम पातळीवरील घरकुलाचा विषय सुद्धा त्यांच्या अंतर्गत येतो अनुदान वाटप केल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी प्रोत्साहित करणे हे सुद्धा त्यांचे काम असते परंतु तसे होताना दिसत नाही ग्रामपंचायत स्तरावर चालू असलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा ते त्यांच्या पद्धतीने सादर करतात शासनाकडून प्राप्त होणारा ग्रामपंचायतला निधी योग्य स्वरूपात खर्च होताना दिसत नाही सदर निधी हा अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधीसाठी पांढरा हत्ती बनत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे ज्या पद्धतीने संबंधित इंजिनियर हे कामे करून घेतात मग घरकुलाचे का काम करून घेत नाही असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार, घरकुल लाभार्थ्यांना पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभागाकडून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासंबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु काही लाभार्थी शासनाने दिलेल्या पैशाचा सदुपयोग करताना दिसत आहेत तर काही लाभार्थी मात्र शासनाचा पैसा घरकुलासाठी न वापरता इतरत्र खर्च करताना दिसत आहे ज्या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचा निधी उचलून घरकुलाचे बांधकाम केले नाही अशा लाभार्थ्याकडून घरकुलाची रक्कम वसूल करण्यासंदर्भात पंचायत समिती स्तरावर नोटीस बजावण्यात आलेल्या आहे.

अनुदान वाढवून देण्याची मागणी

अनुदानाचा आकडा हा जुन्या पद्धतीचा असून एक लाख वीस हजार घरकुल कसे पूर्ण करावे असा प्रश्न सुद्धा घरकुल लाभार्थ्यांमध्ये पडत आहे कारण सद्यस्थितीमध्ये सिमेंट रेती लोखंड आणि घरकुलासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य याचे भाव गगनाला भिडले आहेत शासकीय सिस्टिमेट नुसार घरकुलाचे काम पूर्ण करायचे झाल्यास त्यासाठी पाच ते सहा लाखापर्यंत खर्च येतो परंतु शासनाकडून घरकुल मंजूर झाले ते पूर्ण करताना लाभार्थी आटापिटा करून पूर्ण करतात या घरकुलाच्या असे पोटे लाभार्थी कर्ज धारक बनले आहे घरकुल अनुदानाची रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी सध्या ग्रामस्थांमधून होताना दिसत आहे.

तालुक्यातील 134 घरकुल लाभार्थ्यांना घरकुल हप्त्याचे वाटप केलेले आहे परंतु हप्त्याचे वाटप केल्यानंतर सुद्धा सदर लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्णत्वास नेले नाही अशा लाभार्थ्यांना पंचायत समिती 31 डिसेंबर पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करावे असे आदेशित करण्यात आलेले आहे या मुदतीत बांधकाम पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम आदेश रद्द करण्यात येऊन त्यांच्याकडून दिलेले अनुदान शासकीय नियमानुसार वसूल करण्यात येईल तसेच यानंतर त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार नाही
मुकेश माहोर
गट विकास अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये