Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगनृत्य परिवारने देशाच्या सांविधनाबद्दल निष्ठा राखण्याची घेतली शपथ

चांदा ब्लास्ट

आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित योगनृत्य परीवार कडून परिसंवाद व भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून माननिय सुमित जोशी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्र, चंद्रपूर हे होते.

कार्यक्रमाची सुरवात संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ घेवून करण्यात आले.

न्यायमूर्ती जोशी साहेबांनी संविधान हे एक जातीचे धर्माचे नसून ते प्रत्येक भारतीय साठी आहे हे सांगत पोस्को कायदा लहान मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजासाठी कसा उपयुक्त आहे यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष मनून योग नृत्य परीवार चे संस्थापक गोपळजी मुंदडा हे होते, विशेष अतिथी म्हणून नंदुभाऊ नगरकर माझी नगरसेवक, महानगर पालिकेचे अधिकारी श्री संकेत हजारे होते.

मुख्य अतिथी च्या मार्गदर्शन नंतर आझाद गार्डन ते आंबेडकर पुतळा येथे शांतता रॅली काढल्या गेली. त्यात योगनृत्याचे ५०० च्यावरून सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंगेश खोब्रागडे, छाया हिरोडे, सरिता दुर्गे यांचे कडून करण्यात आले. सूत्र संचालन डॉ प्रीती कांबळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन अशोकजी पडगेलवर यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश घोडके, गीतेश गावंडे, मुग्धा खाडे, रचना साहरे, नरेश महाकुडकर, किरण तुरणकर आणि इतर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये